प्रतिनिधी / रत्नागिरी
काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ०९ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सलग तिसऱ्या दिवशी आणखीन दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बहादूरशेख नाका चिपळूण येथील पुरुष रुग्ण (वय ७२) तसेच शिवतर ता. खेड येथील पुरुष रुग्ण (वय ४४) यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.
आडे, ता. दापोली १
दाभोळ, ता. दापोली २
कडवई, ता. संगमेश्वर १
अंधेरी, कारभाटले ता. संगमेश्वर १
तिवरेवाडी, संगमेश्वर १
इसवली ता. लांजा १
निवळीफाटा हातखंबा ता. रत्नागिरी १
पश्चिम बंगाल १
आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह ११३ (यामध्ये ०१ रुग्ण पुन्हा दाखल)
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४९३
बरे झालेले रुग्ण ३५८
मृत्यू २३