भीषण अपघातात मृताचा चेंदामेंदा
बेळगाव : पुणे-बेंगळूर महामार्गावरील यमनापूरजवळ भरधाव दुचाकीस्वाराने ट्रक्टरला धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना रात्री 8 च्या सुमारास घडली. या अपघातात मृताचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटविणे कठीण झाले होते.
यमनापूरजवळ भरधाव येणाऱया दुचाकीस्वाराने समोरून जाणाऱया ट्रक्टरला धडक दिली. जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. यामुळे त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. या घटनेची माहिती उत्तर रहदारी पोलीस स्थानकाला देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दुचाकी आणि मृताची ओळख पटविणे कठीण झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्या मृताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत होते.