ऑनलाईन टीम / यवतमाळ :
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. त्यातच यवतमाळ मधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. यवतमाळमध्ये वैद्यकीय महविद्यालयाच्या आयासोलशन वॉर्ड मध्ये भरती असलेल्या 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे यवतमाळमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात कोरोनाचे 15 रुग्ण वाढल्यामुळे येथील एकूण संख्या 40 वर पोहचली आहे. मात्र, यातील 10 जणांनी डिस्चार्ज दिल्याने सध्या यवतमाळ मध्ये 30 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
आज ज्या 15 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ते सर्व जण एकाच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते. यामध्ये तीन कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या यवतमाळमधील सर्व व्यवहार 27 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.