सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरालगत असलेल्या यवतेश्वर घाटात रात्री एका कार चालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱयात बिबटय़ाला कैद केल्याचा व्हिडीओ सकाळी साताऱयात सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच अनुषंगाने साताऱयाचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी यवतेश्वर घाटातल्या त्या ठिकाणी पथक पाठवले. सांबरवाडीमध्ये भित्तीपत्रक लावून प्रबोधन केले. ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. तसेच पावसामुळे बिबटय़ाच्या पाऊलाचे ठसे आढळून आले नसले तरीही बिबटय़ाचा वावर असल्याचे निवृत्ती चव्हाण यांनी सांगितले. सातारा शहराच्या लगत असलेल्या किल्ले अजिंक्यताऱयाच्या पाठीमागील सोनगाव तसेच शाहुपूरी परिसरात वारंवार बिबटय़ाच्या दर्शनाच्या वारंवार घटना घडल्या आहेत. तसेच नुकतेच जिह्यात कराड तालुक्यातील बिबटय़ाचे प्रकरण ताजे असताना साताऱयात यवतेश्वर घाटात रात्री एका चार चाकीवाल्यास बिबटय़ा दिसला अन् त्याने त्या बिबटय़ाचा मोबाईलमध्ये व्हिडीओ केला अन् तो तो व्हिडीओ व्हायरल केला. सकाळी साताऱयात सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच साताऱयाचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी पथक त्या परिसरात पाठवले. पथकामध्ये वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक सुहास भोसले, गोरख शिर्तुडे, संतोष चव्हाण यांचा समावेश होता. पावसामुळे त्यांना बिबटय़ाच्या पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. दरम्यान, डॉ. निवृत्ती चव्हाण म्हणाले, त्या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याने प्रबोधनात्मक भित्तीपत्रके लावण्यात आलेली आहेत