प्रतिनिधी/नरंदे :
जीवनात यश संपादन करण्यासाठी खेळाडूंनी सतत विद्यार्थी म्हणूनच राहिले पाहिजे असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार विजेते उत्तमराव पाटील यांनी केले. नरंदे हायस्कूल व देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल नरंदे या निवासी व अनिवासी शिक्षण संकुलाचा तिसावा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय उत्तमराव पाटील उपस्थित होते. त्यांनी क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सुदृढ असले पाहिजे असे उदगार काढले. यावेळी हातकणंगले पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक भवड यांनी विद्यालयातील क्रीडा स्पर्धेस सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले तर संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी प्रमिलाताई देशमुखही उपस्थित होत्या.
यावेळी निवासी व अनिवासी शाळेचे अधीक्षक विजयसिंह देसाई, मुख्याध्यापक ए. एम. मुजावर प्रज्ञाशोध परीक्षा, एकांकिका स्पर्धा, कुस्ती स्पर्धा यांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात विज्ञान प्रज्ञा पात्र विद्यार्थी दीपमाला खोत, पायल यल्लूरे, अमृता भोसले, श्रेया भंडारी, प्रेरणा लोहार ,वैष्णवी देशमुख, आदित्य मेटकर, श्रुष्टी पाटील तसेच इनस्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शन सहभाग प्रमाणपत्र नम्रता वाडकर, सहावी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा पात्र विद्यार्थी सृष्टी गिड्डे, श्रेया पाटील, स्नेहल गुळमुदे, प्रणाली भोरे, स्नेहल एडके, प्रणाली एडके, अर्पिता खोत, प्रणाली पाटील, प्रतिक्षा एडके त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.