अभिनेत्रीने चाहत्यांना केले सतर्क
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचे इन्स्टाग्राम अकौंट हॅक झाले आहे. यासंबंधीची माहिती तिनेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. तसेच स्वतःचे चाहते तसेच फॉलोअर्सना आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंटद्वारे कुठल्याही प्रकारच्या असामान्य घडामोडी घडण्याची शक्यता असल्याचे म्हणत सतर्क केले आहे.
रविवारपासुन माझे इन्स्टा अकौंट हॅक झाले आहे. हे अकौंट लवकरात लवकर पूर्ववत करविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे तिने म्हटले आहे. सपीय इन्स्टाग्राम युजरने यामीची मोठी फॅन फॉलोइंग आहे. अपडेट पोस्ट केल्याच्या काही मिनिटातच तिचे चाहते कॉमेंट करून अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करतात.
यामी लवकरच दसवी या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात यामीसोबत अभिषेक बच्चन आणि निमरत कौर देखील मुख्य भूमिकेत आहेत. दसवी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासह यामी ही अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्या ‘लॉस्ट’ आणि ‘ओएमजी-2’मध्येही दिसून येणार आहे.