येत्या शुक्रवारी बॉक्सऑफिसवर दीपिका पदुकोण आणि अजय देवगण यांच्यात काँटे की टक्कर रंगणार आहे. दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट तर अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर रजनीकांतचा ‘दरबार’ हा चित्रपटही या आठवडय़ाचे आकर्षण ठरणार आहे. ‘तान्हाजी’ हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. हॉलीवूडचे ‘लाईक अ बॉस’, ‘अंडरवॉटर’ आणि ‘माय स्पाय’ हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई