पुतीन यांच्याकडून न्युक्लियर वॉर ड्रिलचे आदेश: स्वतःचे कुटुंब सायबेरियात पाठविले
रशिया-युक्रेन युद्ध आण्विक युद्धाच्या दिशेने सरकू शकते. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी स्वतःच्या सैन्याला न्युक्लियर वॉर ड्रिलसाठी अभ्यास करण्याचा आदेश दिला आहे. तसेच सुरक्षेकरता स्वतःच्या कुटुंबाला सायबेरियात पाठविले आहे. अलिकडेच रशियाने युक्रेनवर ‘किन्झॉल’ हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागले होते. हे क्षेपणास्त्र आण्विक आणि पारपंरिक दोन्ही प्रकारची अस्त्रs वाहून नेऊ शकते. 2 हजार किलोमीटरचा मारक पल्ला असणारे हे क्षेपणास्त्र अणुबॉम्ब देखील वाहून येऊ शकते.
रशियाच्या अधिकाऱयांना धक्का
न्युक्लियर वॉर ड्रिलसाठी अभ्यास करण्याचा आदेश मिळताच क्रेमलिनच्या अधिकाऱयांना धक्का बसला आहे. पुतीन यांच्या या निर्णयाचे परिणाम भयावह असू शकतात असे त्यांचे मानणे आहे. पुतीन देखील आण्विक युद्धाच्या तयारीच्या अभ्यासात भाग घेणार असल्याचे क्रेमलिनच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे. पुतीन यांनी स्वतःच्या कुटुंबीयांना सायबेरियामध्ये हलविले आहे. तेथे त्यांना एका हायटेक अंडरग्राउंड बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे.
न्युक्लियर फोर्सेस अलर्टवर
पुतीन यांनी पूर्वीच स्वतःच्या न्युक्लियर फोर्सेसना हल्ल्यासाठी अलर्ट केले होते. युक्रेनला आण्विक हल्ल्याची धमकी यापूर्वीच देण्यात आली आहे. पुतीन यांनी न्युक्लियर कमांडयुक्त युनिटची सुटी रद्द केली असून त्यांना हल्ल्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्व आण्विक क्षेपणास्त्र फायरिंग मोडवर आणली गेली आहेत.