भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर तसेच स्पर्धात्मक परीक्षा देणाऱया उमेदवारांना त्याचा मोठा त्रास झाला आहे. ही परिस्थिती पाहून नागरी सेवा परीक्षेसाठी (युपीएससी) उमेदवारांना पुढील वषीदेखील संधी द्यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेच्यावतीने दिल्ली येथील कर्मचारी सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय डॉ. जितेंद्र सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी हे निवेदन दिल्लीला पाठविले आहे. युपीएससीसारख्या परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करावी लागते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्यासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न केले आहेत. असे असले तरी येणाऱया नागरी सेवा परीक्षेसाठी पुन्हा एकदा संधी व वयाची सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
युपीएससी परीक्षा 2021 मध्ये असल्यामुळे इच्छुकांचे वय उलटून जाणार आहे. तसेच कोरोनामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे. तेव्हा इच्छुक विद्यार्थ्यांना एक वर्षाची सवलत देऊन त्यांना परीक्षा देण्यास मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदनाची प्रत सुजित मुळगुंद यांनी पाठविली आहे.