कामगार खात्याकडून आस्थापनांची तपासणी
प्रतिनिधी / बेळगाव
कामगार खात्याच्या अधिकाऱयांनी बुधवारी वेगवेगळय़ा आस्थापनांना भेटी देऊन तपासणी केली. यावेळी तीन बालकामगारांची सुटका करण्याबरोबरच यासंबंधी जागृतीही करण्यात आली.
बेळगाव शहर व उपनगरांतील दुकाने, हॉटेल व इतर आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. खासकरून बार, हॉटेलांमध्ये तपासणी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत बाल कामगारांना कामावर ठेवून घेऊ नये, अशी समज देऊन यासंबंधी जागृती करण्यात आली.
बाल कामगारविरोधी माहितीची पत्रके आस्थापनांवर चिकटविण्यात आली. यावेळी कामगार खात्याच्या अधिकारी तरण्णुम बेंगाली, ए. जी. बाळीगट्टी उपस्थित होते. कामगार निरीक्षक, बालसाहाय्यवाणीचे कर्मचारी, पोलीस, शिक्षण खात्याचे कर्मचारी, बाल कामगार योजना संचालकही उपस्थित होते. यावेळी तीन बालकामगारांची सुटका करून त्यांना बालभवनमध्ये ठेवण्यात आले आहे.