ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
युरोपियन युनियमधील देशांमध्ये 12 ते 15 वयोगटातील मुलांना फायझरची लस देण्यास युरोपियन ड्रग्ज रेग्युलेटरने परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे.
फायझरने मागील महिन्यात 12 ते 15 वयोगटातील मुलांवर लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास केला होता. या अभ्यासात ही लस या वयोगटातील मुलांवर प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले. त्यानंतर जर्मनीने आपल्या देशात जूनपासून या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर अमेरिकेतही 12 वर्षावरील मुलांना फायझरची कोरोना लस देण्यास अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे.