प्रतिनिधी/ बेळगाव
मणगुत्ती, ता. हुक्केरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून घडलेला प्रकार निंदनीय आहे. सोशल मीडियावरून अवमानकारक लिखाण, महाराजांचा इतिहास काढून टाकणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने हे वेळीच थांबवावे, यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने सोमवार दि. 10 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.