ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
यूपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी ठाम भूमिका केंद्रीय लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या यूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यूपीएससी पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली.
सुनावणीवेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. या याचिकेवरील पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.