प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचालकास मारहाण करून लूट करणाऱया युवकांच्या टोळक्यास सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने अवघ्या दोन तासांत ताब्यात घेत जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून गुन्हय़ात वापरलेल्या गाडय़ा, लूट केलेली रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी शुभम अनिल रसाळ (रा. पाटखळ माथा), यशवर्धन दीपक पवार (रा. गोडोली), अभिषेक लक्ष्मण फडतरे (रा.सदरबझार), रोहित राजेंद्र रसाळ (रा. बोरखळ), शैलेश काशीनाथ पवार (रा. गुरुवार पेठ सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे (ता. सातारा) गावच्या हद्दीत वाढे ते लोणंद रस्त्यावर ट्रक चालकास लोणंद बाजूकडून येणाऱया चारचाकी वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरुन चारचाकी वाहनातील अनोळखी युवकांनी ट्रकचालकास व क्लिनर यास मारहाण केली. यावेळी टोळक्याने ट्रकची समोरील काच फोडून ड्रायव्हरकडील रोख रक्कम 19 हजार रुपये, दोन मोबाईल व दोन कपडय़ाची बॅग जबरदस्तीने घेवून पळून गेले होते.
ही घटना कळताच वरिष्ठांनी तातडीने या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागातील पथक सतर्क झाले. त्यांनी घटनेबाबत माहिती गोळा केल्यावर लुट करणाऱया एका संशयितास ताब्यात घेतले. त्या संशयिताने त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी चार साथीदारांची नावेही सांगितली. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवत गुह्यातील गेलेली रोख रक्कम, गुन्हा करताना वापरलेली स्कोडा चारचारी वाहन, मोटरसायकल हस्तगत केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, परीविक्षक पोलीस अधिक्षक ऋतु खोकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक सुजित भोसले, कॉन्स्टेबल नितीराज थोरात, सागर निकम, सतिश पवार, उदयसिंह पावरा, हवालदार नरेंद्र मोरे, हेमंत ननावरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
गुन्हा दोन तासात उघड
हा गुन्हा अनोळखी व्यक्तींनी केलेला होता. याबाबत सीसीटीव्ही फुटेज वा कोणतीही तांत्रीक माहिती नसतांना देखील अवघ्या दोन तासांमध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱयांनी केवळ दोन तासात माहिती मिळवून हा गुन्हा उघड करत चार संशयितांना अटक केली आहे.