ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशच्या बागपत येथील एका गोशाळेत आज दुपारी अचानक आग लागली. या आगीत जवळपास 12 गाईंचा होरपळून मृत्यू झाला. तर 18 गाई गंभीर स्वरूपात भाजल्या आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली.तर शॉर्ट शार्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश कुमार म्हणाले की, नांगला येथे ही खासगी गोशाळा कार्यरत आहे. गोशाळेत थंडी असल्याने गोठ्याच्या आतून चारी बाजूंनी हिटिंग उपकरणे लावण्यात आली होती. दुपारी शॉर्टसर्किटमुळे त्या उपकरणांनी पेट घेतला आणि आगीने उग्र रूप धारण केले.