राज्यपाल पि. एस. श्रीधरन पिल्लई यांचे प्रतिपादन. डिचोली मतदारसंघाचा दौरा
डिचोली/प्रतिनिधी
भारत देशावर व देशवासीयांवर येणाऱया कोणत्याही संकटाचा सामना करण्याची क्षमता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केली आहे. हल्लीच झालेल्या रशिया व युपेन यांच्यातील युध्दादरम्यान भारतीय नागरीकांना मिळालेले संरक्षण हि याच क्षमतेची प्रचिती आहे. अशाच प्रकारच्या वाटचालीतून भारताची संपूर्ण जगावर आज वेगळी ओळख व प्रति÷ा निर्माण होत असल्याने भारत देश विश्वगुरू म्हणून पुढे येणार, असे प्रतिपादन राज्यपाल पि. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मुळगाव डिचोली येथे केले.
डिचोली मतदारसंघाच्या दौऱयावर राज्यपाल पिल्लई यांनी सर्वप्रथम मेणकुरे गावाला भेट दिली. आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मेणकुरे गावातील भेटीत त्यांनी शेतकरी व ग्रामस्था?चे प्रश्न समजून घेतले.
यावेळी राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला. स्वामी विवेकानंद, शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्या बद्दल मुलांना माहिती देताना उंच भरारी घेण्याचे आवाहन केले. त्यांनंतर राज्यपालां?नी गावकरवाडा डिचोली येथील श्री शांतादुर्गा मंदिरात भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. ग्रामस्थ गावकरांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर डिचोलीतील चर्च आणि इदगा (निमुजगा) या वास्तूंना भेटी देऊन त्याविषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़?, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्षा सुखदा तेली, नगरसेवक सतीश गावकर, निलेश टोपले, गुंजन कोरगावकर, दिपा शिरगावकर, अँड. रंजना वायंगणकर, दिपा पळ, तनुज गावकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर व इतरांची उपस्थिती होती.
मुळगाव येथील डि लिला सभागृहात झलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़?, प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष कुंदन फळारी, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, मुळगावच्या सरपंचा तृप्ती गाड, लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक, अडवलपालच्या सरपंचा सुबत्ता सामंत, साळच्या सरपंचा सावित्री घाडी, मेणकुरे धुमासेचे सरपंच गुरूदास परब, जिल्हाधिकारी मिहीर वर्धन, उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब, गट विकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर आदींची उपस्थिती होती. 18 नोव्हें. रोजी आपण विक्रम प्रस्थापित करणार
राज्यपाल या नात्याने राज्यातील सर्व गावांना भेट देण्याचा देशातील विक्रम आपण 18 नोव्हें. रोजी नोंदविणार आहे. 18 रोजी मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघाचा दौरा आपण करणार व या मोहिमेची सांगता होणार आहे. गोव्यातील लोक हे अत्यंत मेहनती, कष्टाळू, प्रामाणिक आहेत. येथील कला व संस्कृती, परंपरेला मोठे महत्त्व असून सर्व भागातील लोक, नेते, आमदार यांच्यामुळे गोव्यातील सर्व गावांची माहिती मिळविणे सोपे झाले. असे यावेळी राज्यपाल पि. एस. श्रीधरन पिल्लई यांनी म्हटले.
यावेळी राज्यपालांनी आमदार डॉ. शेटय़? यांच्याबध्दल विशेष गौरवोदगार काढताना, हे डॉक्टर म्हणजे एक आश्चर्य असून उत्तम रित्या लोकांची सेवा करण्याचा डॉक्टरी पेशा व दुसऱया बाजूने राजकारण व समाजसेवाही करीत आहे, असे म्हटले. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते दिलीप धारगळकर, मेहरूनिसा तोटागड्डी, सुरेश राऊत, मधुकर परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच किडनी व कँसर रूग्णांना आर्थिक सहाय्य वितरीत करण्यात आले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी, डिचोली हा कृषीप्रधान मतदारसंघ असून कृषीविषयक अनेक विषय व समस्या सरकारदरबारी आहेतच. त्याचप्रमाणे खाणबंदीमुळे वाढलेल्या बेरोजगारीवर अंकुश आणण्यासाठी सरकारकडून पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच लाटंबार्से औद्योगिक वसाहत, कला भवन व इतर विकास प्रकल्प डिचोलीत येणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
धनगर बांधवानी सादर केलेल्या गजनृत्य तसेच ग्रामीण महिलांनी सादर केलेली धालो गीते राज्यपाल यांना खूपच आवडली. यावेळी राज्यपालांच्या पत्नी उपस्थित होत्या.