प्रतिनिधी /मडगाव
ज्ये÷ साहित्यिक आणि पत्रकार ऍड. उदय भेंब्रे यांना यंदाचा स्व. चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी होणाऱया स्व. केणी यांच्या 88 व्या जयंती निमित्त मडगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार भेंब्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार असलेले स्व. केणी यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात कोंकणी भाषा आणि गोवा राज्य या दोन गोष्टींच्या उत्कर्षासाठी काम केले. त्यांचेच हे कार्य पुढे नेणाऱया ज्ये÷ पत्रकाराला दरवषी हा पुरस्कार दिला जातो. यंदा 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मडगाव नगरपालिका सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हा मानाचा पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती आणि फोमेंतो उद्योग समूहाचे अध्यक्ष अवधूत तिंबले यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे.
ऍड. उदय भेंब्रे यांनी जनमत कौल आंदोलनात स्व. केणी आणि अन्य सहकाऱयांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते. ज्यामुळे गोव्याचे विलीनीकरण न होता त्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिले होते. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.