ग्राम पंचायत सदस्यांचे हेस्कॉमच्या अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूरच्या वेशीत असलेल्या शिवसेना मंडळाच्या फलकाच्या मागील बाजुस विजेचा ट्रान्स्फॉर्मर आहे. ट्रान्स्फॉर्मर धोकादायक असून तो हटवावा तसेच गावात विविध ठिकाणी असलेले जुने विद्युतखांब हटवावेत यासह इतर समस्यांसंदर्भात येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांच्यावतीने हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी विवेक नाईक यांना निवेदन देण्यात
आले.
वेशीमध्ये असलेला तो ट्रान्स्फॉर्मर धोकादायक आहे. याचबरोबर गावामध्ये अनेक ठिकाणी जुने विद्युतखांब आहेत, ते देखील हटविणे गरजेचे आहे. काही ठिकाणी खांब कलंडलेले आहेत. ते खांब दुरुस्त करावेत. शिवाजीनगर, परमेश्वरनगर, कलमेश्वरनगर, हनुमाननगर, चिठ्ठी कॉलनी, मंगाईनगर या परिसरात स्ट्रीट लाईट नाहीत. ते बसवावेत, अशी मागणी येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत ग्राम पंचायतमध्ये ठराव देखील करण्यात आला आहे. ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे यांनी ठराव केला होता. त्या ठरावाला ग्राम पंचायत सदस्य महेश कानशिडे यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर तातडीने हे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य रमेश मेणसे, महेश कानशिडे, सदस्य राकेश परीट, भरत मासेकर यांनी हे निवेदन दिले आहे..