प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या ग्रंथालयासाठी चेतन कल्लाप्पा हुंदरे, विक्रम परशराम कुंडेकर, महेश प्रकाश पाटील यांच्याकडून पुस्तके भेट देण्यात आली आहेत. यामध्ये स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे.
इंग्रजी स्पिकिंग, शेअर मार्केट, आर्थिक, आध्यात्मिक आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील, सदस्य शिवाजी नांदुरकर, प्रमोद पाटील, राकेश पाटील, परशराम परीट, दयानंद उघाडे, कल्लाप्पा मेलगे, सुनिल अरळीकट्टी व ग्रंथालयाचे कर्मचारी कलमे कोकणे आदी उपस्थित होते.