ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेसेज उत्तरप्रदेश पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्सॲप नंबरबर आला आहे. याप्रकरणी गोमतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी धीरज कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास उत्तरप्रदेश पोलीस मुख्यालयाच्या (UP112) व्हॉट्सॲप नंबरबर ( 7570000100) यासंदर्भातला एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, ‘योगी अदित्यनाथ समाजाचे शत्रू आहेत, त्यामुळे मी त्यांना बॉम्बने उडवून देणार आहे.’ 8828453350 या मोबाईल क्रमांकावरून ही धमकी आली असून, पोलिसांनी मोबाईल नंबरवरून संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.