स्वप्न पूर्ण झाल्याची अभिनेत्रीची प्रतिक्रिया
दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना स्वतःचा उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांमधील अभिनयाच्या छोटय़ा छोटय़ा क्लिप व्हायरल होत असतात. आता तिने संदीप रेड्डी वांगा यांचा चित्रपट ‘ऍनिमल’मध्ये मुख्य भूमिका मिळाल्याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ऍनिमल चित्रपटावरून माझ्या नावाची घोषणा करण्यात आल्याने मी आनंदी आहे. याची पटकथा अद्भूत असण्यासह एका उत्तम टीमसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. हे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. या चित्रपटाचय चित्रिकरणात सामील होण्यासाठी आणखीन प्रतीक्षा करू शकत नसल्याचे रश्मिकाने म्हटले आहे.
या चित्रपटात रणवीर कपूरसोबत अभिनेत्री परिणीति चोप्रा दिसून येणार होती. परंतु परिणीति अन्य चित्रपटांच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने तिने हा चित्रपट सोडला होता. आता रश्मिका मंदाना या चित्रपटात रणवीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटात रणवीर आणि रश्मिका पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर एकत्र दिसून येतील. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
मिशन मजनूद्वारे बॉलिवूड पदार्पण
रश्मिका मंदाना लवकरच शांतनू बागची यांचा चित्रपट ‘मिशन मजनू’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा नायकाच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानात भारताकडून पार पडलेल्या सर्वात साहसी मोहिमेवर हा चित्रपट आधारित आहे. आरएसवीपी मूव्हीजच्या बॅनर अंतर्गत निर्माण झालेला हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.