प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील एका कंप्युटर ट्रेनिंग सेंटरकडून बेरोजगार तरूण-तरूणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े या ट्रेनिंग सेंटरकडून त्यांच्याकडे कोर्स केलेल्या मुलांना स्टेट बँक ऑफ इंडीयामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून या मुलांकडून लाखो रूपये उकळल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत शंका निर्माण झाल्याने काही मुलांनी स्टेट बँकेकडे संपर्क साधला असता अशी कोणतीही नोकर भरती नसल्याचे सांगण्यात आल़े नोकरीच्या शोधात असलेल्या मुलांकडून यासाठी पैसे उकळण्यात आल्याने संताप व्यक्त होत आह़े याप्रकरणी स्टेट बँकेच्या कर्मचाऱयांनी या कंप्युटर सेंटरवर कारवाईसाठी पोलिसांत धाव घेतली आहे.
शहरातील नावाजलेल्या या कंप्युटर ट्रनिंग सेंटरकडून गेल्या काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक मेसेज टाकण्यात आला होत़ा यामध्ये इंग्रजी टायपिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडीया बँकेत नोकरीची संधी आह़े स्थानिकांना प्राधान्य, इंग्रजी टायपिंग 20 शब्द प्रतिमिनीट व निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना 14 हजार 400 पगार देण्यात येणार आहे. नोकरीसाठी आपला बायोडाटा पाठवण्याचे या कंप्युटर सेंटरकडून सांगण्यात आले होते.
कंप्युटर सेंटरचा हा मेसेज व्हायरल होताच तरूण-तरूणींकडून नोकरीसाठी मोठय़ा संख्येने अर्ज पाठवण्यात आल़े यावेळी या सेंटरकडून विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये उकळण्यात आल्याची चर्चा आहे. पैसे देवूनही नोकरी मिळत नसल्याने तरूण-तरूणींमध्ये अस्वस्थता वाढू लागल़ी यासाठी कंप्युटर सेंटरकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता असमाधानकारक उत्तरे देण्यात आल़ी
अखेर संयम सुटल्याने या मुलांचा थेट ही बाब स्टेट बॅकेच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आणल़ी यावेळी हा सर्व फसवणूकीचा प्रकार असल्याचे समोर आल़े हा प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास येताच बँकेकडून पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े या संदर्भात येथील बँकेकडून पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कार्यावाहिलाही सुरुवात झाली आहे.
आमिषाला बळी पडू नये
स्टेट बँकमध्ये भरतीची प्रक्रिया संपूर्ण देशभर राबवण्यात येत़े अशा प्रकारे स्थानिक स्तरावर भरती होत नाह़ी त्यामुळे मुलांनी बँकेतील नोकरी संदर्भात कोणत्याही आमिषाला बळी पडू नय़े काही शंका असल्यास बँकेच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधाव़ा संबंधित कंप्युटर सेंटरवर कारवाई संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आह़े