मौजेदापोली / वार्ताहर
दापोली शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्या दापोली शाखेसमोरील खोक्यांवर बांधलेले ग्रीन शेड नेट काढून चोरट्याने काल रात्री सुमारे 18 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला असून त्यात कांदे, बटाटे व कढई यांचा समावेश आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली शहरातील जुन्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर प्रवीण शेट यांचे कांदे, बटाटे विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात सदर चोरी झाली. याबाबत शेट यांनी दापोली पोलीस स्थानकात या विरुद्ध तक्रार दिली आहे. दापोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सुदर्शन गायकवाड करत आहेत.