एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरु
वार्ताहर / देवरुख
मार्लेश्वर मार्गावरील कासारकोळवण येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेही बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु होता. तो सायंकाळच्या दरम्यान दुसऱ्या ही तरुणाचा मृतदेह सापडला आहे .पहिला मृतदेह मासे पकडणाऱ्या घोरपी बांधवांनी शोधून काढला तर दुसरा मृतदेह शोधण्यात राजु काकडे हेल्प ॲकॅडमीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
या वेळी घटनास्थळी पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, राजु काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते हजर आहेत.यातील पहिला मृतदेह
हे युवक हातीव गावातील असून काल दुपारी ते नदीवर गेले होते. संध्याकाळी परत न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला होता तो दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर संपला आहे.याच दरम्यान घटनास्थळी त्यांची मोटारसायकल सापडल्याने ते बुडाल्याचा अंदाज धरून शोध मोहीम सुरु करण्यात आली होती.