प्रतिनिधी / रत्नागिरी
तालुक्यातील वाटद-खंडाळा बाजारपेठ येथे दारूचे अतिसेवन केल्याने संतोष महादेव शितप (45, वाटद-खंडाळा शितपवाडी) या तरूणाचा मृत्यू झाल़ा घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े.
या घटनेची खबर संदीप महादेव शितप यांनी पोलिसांत दिल़ी संतोष शितप गुरूवारी सायंकाळी मित्रांसोबत वाटद-खंडाळा बाजारपेठ येथे दारू पिण्यासाठी बसले होत़े. दारूचे अतिसेवन केल्याने त्यांना घरी जाता आले नव्हत़े त्याचे मित्र संतोषला त्याच ठिकाणी ठेवून आपल्या घरी निघून गल़े. शुक्रवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संतोष यांना मृत घोषीत केल़े.