वृत्तसंस्था/ मुंबई
भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱया आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघामध्ये जखमी रविंद्र जडेजाच्या जागी सौरभ कुमारला संधी देण्याची शक्मयता असल्याचे वृत्त आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही.
अष्टपैलू रविंद्र जडेजा अद्याप स्नायू दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो या आगामी कसोटी मालिकेसाठी उपलब्ध राहू शकणार नाही, असे भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. भारत अ संघातील उत्तर प्रदेशचा गोलंदाज सौरभ कुमारला या दौऱयासाठी भारतीय संघात संधी मिळण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. निवड समितीतर्फे ही औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेश विरुद्ध होणाऱया वनडे मालिकेसाठी जडेजाच्या जागी अष्टपैलू शहबाज अहमदला संघात स्थान देण्यात आले आहे. शहबाज अहमदने उत्तर प्रदेश आणि सेनादल संघाचे 52 प्रथमश्रेणी सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. 29 वषीय सौरभ कुमारने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 24.57 धावांच्या सरासरीने 222 गडी बाद केले आहेत. बांगलादेश आणि भारत यांच्यातील पहिली कसोटी चेतोग्राम येथे 14 ते 18 डिसेंबर तर दुसरी कसोटी मिरपूर येथे 22 ते 26 डिसेंबर दरम्यान होणार आहे.