पोवईनाका ते मोनार्क चौक रस्ता वाहतूकीसाठी होणार खुला
प्रतिनिधी/सातारा
ग्रेड सेपरेटरच्या खोदकामामुळे पोवईनाका ते मोनार्क चौक असा मार्ग बंद होता. तो आता वाहतूकीसाठी सुरू होणार असून या मार्गावर डांबरीकरण करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमध्ये ग्रेड सेपरेटरच्या कामाला बेक लागला होता. अनलॉक ची प्रकिया सुरू होताच पुन्हा कामाचा वेग वाढला. यामुळे गेल्या वर्षभरापासून खोदकामामुळे पोवईनाका ते मोनार्क चौक असा रस्ता बंद होता. रस्ता बंद असल्याने वाहतूकीवरचा ताण वाढला होता. खोदकामामुळे रस्त्यावर खड्डी-मातीचा ढिग वाढला होता. यांचा नाहक त्रास वाहनधारकांना होऊ नये म्हणून गेल्या दोन दिवसांपासून डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. खड्डी-माती टाकून डांबरीकरण करण्यात येत आहे. डांबरीकरणासोबत रस्ता रूंदीकरणही करण्यात येत आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह आता अवजड वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही. वाहनांची संख्या वाढली तरी कोंडी होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.