बेळगाव /प्रतिनिधी
एकीकडे स्मार्ट सिटीची होत असलेली संथगतीची कामे, त्यात होणारी वाहतूक कोंडी, एक मार्ग बंद असल्याने दुसऱया मार्गावरून दुहेरी वाहतूक असे चित्र सध्या शहरात सर्वत्र दिसत आहे. मार्केट पोलीस स्थानकाजवळ तर ही समस्या गंभीर बनली आहे.
ओल्ड पी. बी. रोडवरील वनविभागापासून ते मार्केट पोलीस स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अशाप्रकारे वाहने लावल्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकही जवळच असल्यामुळे या मार्गावर ये-जा करणाऱया पादचाऱयांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असून पादचाऱयांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे.
दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा असल्यामुळे पादचाऱयांना व येणाऱया वाहनांना थांबून जावे लागत आहे परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.