ऑनलाईन टीम / जोधपूर :
राजस्थानच्या जोधपूर भागात गुरूवारी 4.0 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जोधपूरपासून 106 किमी दूर पश्चिम दक्षिण पश्चिमजवळ होता. मध्यम तीव्रतेच्या या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा इतर कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
नॅशनल स्टेंटर फॉर सीस्मोलॉजी कडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी 4.0 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाच्या तीव्र धक्क्यामूळे घाबरून बरेच लोक मोकळय़ा मैदानात जमा झाल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. यापूर्वी बंगालच्या खाडीमध्ये मंगळवारी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टल स्केल एवढी होती.