वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील प्रँचायझी राजस्थान रॉयल्स संघाने स्टीफन जोन्स यांची वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. शुक्रवारी या संघाच्या व्यवस्थापनाने ही घोषणा केली.
48 वषीय स्टीफन जोन्स हे वेल्स संघाचे माजी वेगवान गोलंदाज आहेत. 2019 साली त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. या नियुक्तीमुळे राजस्थान रॉयल्स संघातील सर्व गोलंदाजांना जोन्स यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. 7 ते 10 मार्च दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाच्या सराव शिबिरात जोन्स या संघातील गोलंदाजांबरोबर पहिले मार्गदर्शन सत्र घेत आहेत.