किणये / वार्ताहर
किराणा दुकानात साहित्य आणण्यासाठी जात असताना सुळगा-येळ्ळूर रोडवर दुचाकी अपघातात राजहंसगड येथील किराणा दुकानदार जागीच ठार झाला. वैजू नागय्या गुर्लकट्टी (वय 55) असे त्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव असून सदर घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली आहे.
मंगळवारी पहाटे वैजू गुर्लकट्टी हे दुचाकीवरून सुळगे-येळ्ळूर रोडवरून किराणा साहित्य आणण्यासाठी बेळगावला येत होते. सुळगे पार केल्यानंतर येळ्ळूरनजीक येत असताना दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर पडले. त्यांनी डोक्मयाला हेल्मेट घातले होते. मात्र, हेल्मेट बाजूला जाऊन पडले होते. त्यांच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे सुळगा, येळ्ळूर व राजहंसगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी वडगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी धाव घेऊन पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी येळ्ळूर-वडगाव रस्त्यावर दुचाकीवरून पडून पोलीस उपनिरीक्षकांचा मृत्यू झाला होता. पुन्हा अशा प्रकारचीच घटना या रस्त्यावर घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. राजहंसगड येथील नंदिहळ्ळी रोडवर त्यांचे किराणा दुकान आहे. ते वारकरी होते