प्रतिनिधी/ बेळगाव
अगसगा (ता. बेळगाव) येथील राजू इराप्पा गडाद यांनी मांडलेल्या भारतरत्न प्रा. सी. एन. राव : अ सॅन्टोमेट्रीक पोर्ट्राईट या प्रबंधाला राणी चन्नम्मा विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे.
राजू यांना डॉ. बी. रवी यांचे मार्गदर्शन व डॉ. किरण सवनूर यांची मदत मिळाली. राजू हे केएलई संस्थेच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरपीमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. प्राचार्य, प्राध्यापक व त्यांच्या सहकाऱयांनी त्यांचे कौतुक केले असून अत्यंत गरिबीत शिक्षण घेऊन पीएचडी पूर्ण केलेल्या राजू यांचे ग्रामस्थांनीही कौतुक केले आहे.