प्रतिनिधी /पणजी
गरीबांसाठी फूड बँक या संस्थेअंतर्गत 6 केंद्रांमध्ये बेघर व्यक्तींना अन्न पुरविणारी स्ट्रीट प्रोव्हिडन्स या एनजीओच्या सहकार्याने राज भवनतर्फे आठवडय़ातून एकदा सुमारे 100 व्यक्तींसाठी ताजे अन्न पुरविण्यात येणार आहे. हे अन्न स्ट्रीट प्रोव्हिडन्सकडून बेघर व्यक्तींना वितरीत करण्यात येईल.
राज्यपाल, श्री पी एस श्रीधरन पिल्लई 17 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ करतील.राज्यपाल 100 बेघर व्यक्तींसाठी स्ट्रीट प्रोव्हिडन्सचे संस्थापक श्री डोनाल्ड फर्ना?डिस यांना अन्नाचे पहिले पॅकेट सुपूर्द करतील .