प्रतिनिधी /बेळगाव
राज्यपाल थावरचंद गेहलोत हे मंगळवारी बेळगावात दाखल झाले. सांबरा विमानतळावर आगमन होताच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विश्वेश्वरय्या तांत्रिक महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी ते बेळगावात आले होते.
राज्यपाल बेळगावात दाखल होत असल्यामुळे सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सांबरा रोडवरही पोलीस तैनात करून वाहतूक थांबविण्यात आली होती. दुपारी राज्यपालांचे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे आणि राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. रामचंद्रगौडा यांनी त्यांचे स्वागत केले.