प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2019 मधील राज्य सेवा परीक्षेचा अंतिम सुधारीत निकाल मंगळवारी जाहीर केला. या परीक्षेत कोल्हापुरातील प्रसन्नजीत प्रकाश चव्हाण, अमित नांगरे-पाटील, रोहिणी किरण पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
राज्यसेवा परीक्षेतून प्रसन्नजीत चव्हाण यांची उपजिल्हाधिकारीपदी, अमित नांगरे-पाटील यांची नायब तहसिलदारपदी तर रोहिणी पाटील यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले. राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, नियुक्ती झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.