वार्ताहर /पणजी
सावळे-पिळर्ण येथील श्री महारुद्र आम्रकेश्वरनाथ देवस्थानात, वर्धापनदिनानिमित 12 वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मयडे येथील काया लोटलीकर हिने प्रथम बक्षीस पटकावले.
धुळेर, म्हापसा येथील धृवी वेर्णेकर हिला द्वितीय बक्षीस तर वास्को येथील वीर वस्त याला तृतीय बक्षीस प्राप्त झाले. केपे येथील दित्या शिरवईकर हिला चौथे आणि शिगाव येथील सृष्टी देसाई हिला पाचवे बक्षीस देण्यात आले. दिविशा सांगोल्डकर व जिविका नाईक यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक, दै. तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू भि. नाईक, पंच अमरनाथ गोवेकर, उद्योजक देवानंद अर्जुन नाईक, श्री महारुद्र आम्रेकरनाथ देवस्थानचे अध्यक्ष योगानंद नाईक, विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष विलास सावळेकर, निवृत्त मुख्याध्यापक अरुण नागवेकर, परीक्षक नितीन कोरगावकर व अलिशा सीमेपुरुषकर यांच्या उपस्थितीत झाले.
मान्यवरांनी मनोगतात देवस्थान विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून सांस्कृतिक परंपरा जोपासत असल्याबद्दल व मुलांना व्यासपीठ देत असल्याबद्दल समाधन व्यक्त केले. अरुण नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले.