आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील पहिले-वहिले गोवा रोबोटिक सर्जरी सेंटर पणजी येथील डॉ. केदार पडते यांच्या इस्पितळांमध्ये सुरू झाले आहे. आज दोनापावला येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमांत आरोग्यमंत्री विश्वजित राणे व महसूल मंत्री जेनिफर मोन्सरात यांनी या रोबोटिक सर्जरी सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी लॅप्रोस्कोपी व रोबोटिक सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर, प्रख्यात गायनोलॉजी सर्जन डॉ. निता वर्टी, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. केदार पडते व डॉ. जयश्री पडते उपस्थित होते.
सीएमआर सर्जिकल लिमिटेड युके यांच्या सहकार्याने हे गोव्यातील पहिले रोबोटिक सर्जरी सेंटर सुरू झाले आहे. गोव्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ. केदार पडते यांच्या पणजी येथील इस्पितळात हे केंद्र सुरू झालेले आहे.
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री विश्?वजित राणे म्हणाले, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात जे पाचशे कोटींचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार आहे, त्यामध्ये रोबोटिक सर्जरी उपलब्ध व्हावी यासाठी डॉ. केदार पडते यांच्याशी सामंजस्य करार करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळामध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ओर्थोपेडिक सर्जरी करण्यासाठी रोबोटिक सर्जरीचा वापर करण्यावर विचार करण्यात येईल. रोबोटिक सर्जरीमुळे योग्य शस्त्रक्रिया होतानाच त्याचा परिणामही चांगला मिळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे नव्या सुधारणांबरोबर गोवा सरकार जाणार आहे.
गोव्यातील डॉ. केदार पडते यांनी केलेली ही सुरुवात अनेकांना मदतगार होणार असून पंतप्रधानांनी देशातील तमाम जनतेला चांगले आरोग्य उपचार देण्याचे जे स्वप्न पाहिले आहे ते अशाच प्रयत्नातून पूर्ण होणार असल्याचे विश्?वजित राणे म्हणाले.
जेनिफर मोन्स?रात म्हणाल्या, आरोग्य क्षेत्रात रोबोटिक सर्जरी एक मैलाचा दगड ठरणार असून डॉ. केदार पडते यांनी गोवेकरांना चांगली सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देत आहे. माणसाकडून ज्या चुका होतात त्या रोबोटकडून होणार नाहीत. रोबोटिक सर्जरी ही एक सुरक्षित व वेळ वाचवणारी शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे रोबोटिक सर्जरीला जगाने स्वीकारले आहे. आता भारत आणि गोवाही स्वीकारत आहे. नवे तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात स्वीकारले जाते, आता ते प्रसुती क्षेत्रांमध्येही आणि इतर क्षेत्रांमध्ये स्वीकारले जात असून हे एक स्वप्न वाटत असले तरी ते सत्य आहे, असे डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितले. या नव्या तंत्रज्ञानासाठी जागृतीची गरज असल्याचे सांगून डॉ. केदार पडते यांनी गोमंतकीयांना ही सेवा उपलब्ध करून दिली त्याचा लाभ गोवेकरांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
माणसाने बदला सोबत जायला हवे. बदल स्वीकारायला हवा. माणूस भविष्यात काय घडणार याचा विचारही करू शकत नाही असे बदल सध्या सर्व क्षेत्रात घडत आहेत . तसेच ते आरोग्य क्षेत्रातही घडत आहेत. असे प्रतिपादन डॉ. नीता वर्टी यांनी केले. डॉ.केदार पडते यांनी नेहमीच मोठा विचार केलेला आहे. रोबोटिक सर्जरी सेंटर गोव्यात सुरू करून त्यांनी जो विचार केलेला आहे त्याला यश नक्कीच मिळणार असल्याचे डॉ.नीता वर्टी यांनी सांगितले.
रोबोटिक सर्जरी चे मोफत प्रशिक्षण आपण गोव्यातील डॉक्टरांना देण्यास तयार असल्याचे त्यावेळी बोलताना डॉ. केदार पडते यांनी सांगितले. आपण गोवेकरांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले. डॉ केदार पडते हे गोव्यातील एक प्रसिद्ध प्रसुती व स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी गेल्या 32 वर्षांपासून 40 हजार महिलांवर उपचार केले. मूल होत नसल्याने दुःखी असलेल्या 17 हजार महिला त्यांच्याकडील उपचाराने गरोदर राहिल्या. आयव्हीएफ पध्दतीने 1 हजार महिलांना मातृत्व मिळवून दिले आहे.