ण्हापसा/ प्रतिनिधी
सरकारकडून सर्वतो परीने उपाय योजना आखल्या जात असतांनाही राज्यात कोरोना महामारीचा प्रकोप वाढतच आहे. अशा परिस्थितीत एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा सर्वानी एकजुटीने कोरोनाचा सामना करणे आज काळाची गरज आहे . सध्याच्या स्थितीत राज्यातील प्रत्येकाने अठरा वर्षावरील तरुणांसहित ते पंचेचाळीस वर्षावरील पुरुष महिलांनी कोवीड प्रतिबंधक लस टोचणी करून घेण्यासाठी स्वताहून पुढे यावे आणी इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटात केले. गांवरावाडो -कळंगुट येथील सेंट जोजेफ हायस्कुलच्या आवारात कोवीड प्रतिबंधक लस टोचणी केद्राचे उद्घाटन शनिवारी सकाळी त्यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी त्यांच्यासमवेत कळंगुटचे सरपंच शॉन फर्ना?डिस, कांदोळी आरोग्य केद्राचे आरोग्याधिकारी, इतर कर्मचारी वर्ग तसेच कळंगुट तसेच कांदोळी पंचायत मंडळाचे पंचायत मंडळ उपस्थित होते. दरम्यान, गावागावांतील स्थानिक आरोग्य केद्रावर कोवीड शिल्ड वेक्स?िनेशनचा ताण पडुं नये यासाठी प्रत्येकी दोन -दोन पंचायतींनी एकत्रित येत आपापल्या गावातील उपलब्ध शाळा- हायस्कुल्सच्या तसेच मंदिरे आणी चर्चेसच्या खुल्या सभागृहात अशा प्रकारची केदे सुरू करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. दरम्यान, कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात आल्याने महिन्याभरापुर्वीच आपण आपल्या सहयोगी पंचायतींच्या सहकार्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वप्रथम कळंगुट, कांदोळी, नागवां- हडफडें तसेच पर्या पंचायत क्षेत्रात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जेणेकरून कोरोनाची साखळी तुटण्यास त्याची मदत झाली. त्यानंतर पंचक्रोशीतील एखाद्याला कोवीड चाचणीसाठी स्थानिक आरोग्य तसेच वेक्सनेशन केद्रापर्यत जाण्यायेण्यासाठी मोफत एम्ब?लन्सची सोय केली जी आजही सुरु आहे, त्यांचबरोबर कोवीड चाचणीत सकारात्मक निघाल्याने घरच्या घरी आयझोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी मोफत जेवण खाण तसेच कोवीड कीटची घरपोच व्यवस्था स्थानिक पंचायती तसेच सेवाभावी संस्था?च्या मार्बत करण्यात येत असल्याचे मंत्री लोबो यांनी शेवटी सांगितले…..