रविवारी 12,209 नवे रुग्ण : 25,659 जण कोरोनामुक्त : दिवसभरात 320 बळी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून पॉझिटिव्हीटी दरही कमी झाला आहे. राज्यात रविवारी एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हीटी दर 7.71 टक्के इतका होता. शनिवारी तो 9.69 टक्के होता. मात्र, म्हैसूर, धारवाड, मंडय़ा, मंगळूर, हासन, तुमकूर, बेळगाव या जिल्हय़ांमधील पॉझिटिव्हीटी दर अधिक आहे.
राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 12,209 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 25,659 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, रविवारी 320 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 26,95,523 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 24,09,417 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 31,580 जणांचा बळी गेला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 2,54,505 इतकी आहे.
बेंगळूर शहरातही संसर्ग नियंत्रणात येत आहे. येथील सक्रिय रुग्णसंख्या 1.17 लाख इतकी आहे. तर दिवसभरात 2,944 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.
आरोग्य खात्याने रविवारी दिलेल्या हेल्थ बुलेटिननुसार बेंगळूर शहर जिल्हय़ात सर्वाधिक 2,944 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर बागलकोट जिल्हय़ात 166, बळ्ळारी जिल्हय़ात 285, बेळगाव 418, बेंगळूर ग्रामीण 277, बिदर 7, चामराजनगर 247, चिक्कबळ्ळापूर 348, चिक्कमंगळूर 416, चित्रदुर्ग 266, मंगळूर 609, दावणगेरे 143, धारवाड 262, गदग 133, हासन 655, हावेरी 138, गुलबर्गा 60, कोडगू 162, कोलार 257, कोप्पळ 212, मंडय़ा 571, म्हैसूर 1,237, रायचूर 104, उडुपी 494, तुमकूर 698, कारवार 360, विजापूर 190 आणि यादगीर जिल्हय़ात 34 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.