बेंगळूर : राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. शुक्रवारी राज्यात 1,805 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील चोवीस तासांत 1,854 जण संसर्गमुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात 36 बाधितांचा बळी केला आहे. मागील चोवीस तासांत 1,62,338 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 1.11 टक्के तर मृत्यूचा दर 1.99 टक्के इतका आहे.
आरोग्य खात्याच्या बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 29,15,317 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापैकी 28,54,222 जणांनी कोरोनावर मात केली आहेत. तर एकूण 36,741 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 24,328 इतकी आहे.