बेंगळूर : राज्यात मागील आठवडय़ापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सोमवारी नव्या बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. मागील चोवीस तासांत राज्यात 1,285 कोरोना रुग्ण आढळून आले. दिवसभरात 1,33,030 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 0.96 टक्के इतका होता. सोमवारी दिवसभरात 1,383 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात 25 रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 24,021 इतकी आहे. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत एकूण 29,08,284 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकूण 28,47,627 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 36,612 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Trending
- पुदुच्चेरी ते मुंबईपर्यंत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी
- आरसीबीचा प्ले ऑफमध्ये प्रवेश
- पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी 695 उमेदवार
- गॅसचा भडका उडून वृद्ध दाम्पत्य जखमी
- पंजाबविरुद्ध आज हैदराबादचे दुसरे स्थान पटकावण्याचे लक्ष्य
- ‘बर्निंग बस’ दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू
- राजस्थान रॉयल्सचा मुकाबला आज ‘केकेआर’शी
- कॅम्प येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला सुरुवात