प्रतिनिधी /बेंगळूर
केंद्र सरकारच्या कोटय़ातून कर्नाटकाला सोमवारी कोव्हिशिल्डचे 3 लाख डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे. राज्यात लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण अभियान संथगतीने सुरू असतानाच केंद्र सरकारकडून लसीचा आणखी साठा मिळाल्याने लस घेणाऱयांना दिलासा मिळाला आहे. डॉ. सुधाकर यांनी यासंबंधीचे ट्विट केले असून केंद्राकडून आतापर्यंत कोव्हिशिल्डचे 1.05 कोटी डोस उपलब्ध झाले आहेत. तर राज्य सरकारने लस उत्पादन करणाऱया कंपन्यांकडून थेट 13.54 लाख डोस खरेदी केल्या आहेत. राज्याला आतापर्यंत कोव्हॅक्सिनचे एकूण 13.10 लाख डोस मिळाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.