क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा क्रीडांगणावर बेळगाव जिल्हा राज्य सरकारी नोकर सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेत 72 किलो वजनी गटात सुलेमान इमामसाब सनदी यांनी सुवर्णपदक पटकावल्याने त्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंतप्रधान ग्रामीण सडक योजना खात्याचे वर्क इन्स्पेक्टर सुलेमान सनदी यांनी 72 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात रायबागच्या पैलवानाविरुद्ध खेळताना 7-3 गुणफरकाने विजय मिळवित सुवर्णपदक पटकाविले.
त्यांची 26 फेब्रुवारी रोजी बिदर येथे होणाऱया राज्यस्तरीय सरकारी नोकर सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.