वृत्तसंस्था/ इकेनटेल
जर्मनीत सुरू असलेल्या एटीपी टूरवरील इकेनटेल चॅलेंजर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथनने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना रशियाच्या डॉनस्कॉयचा पराभव केला.
गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रामकुमार रामनाथनने केवळ 57 मिनिटांच्या कालावधीत रशियाच्या डॉनस्कॉयचे आव्हान 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणताना 11 बिनतोड सर्व्हिसची नेंद केली. 88,520 युरोस एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत रामकुमारने 35 गुणांची कमाई निश्चित केली आहे.