प्रतिनिधी /तिसवाडी
कुंभारजुवे गावातील रामभुवन वाडा येथे अनेक वर्षांची मागणी असलेल्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होऊन समाजकार्यकर्ते राजेश फळदेसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच फीत कापून त्याचे उद्घाटन करण्यात आले.
लोकांच्या मागणी नुसार आपण हा रस्ता तयार करुन दिला आहे. लवकरच या ठिकाणी पथदीप तसेच बसण्यासाठी बाकडय़ांचीही व्यवस्था करण्यात येईल. यापुढेही लोकांची कामे करण्यास आपण कटीबद्ध आहे, असे राजेश फळदेसाई म्हणाले.
लक्ष्मण (बाबु) रायकर यांनी सांगितले की लोकांची लहानसहान कामे आपण करत असून मोठी कामे असल्यास फळदेसाई यांच्याकडून करुन घेतली जातील. प्रशांत भांडारे यांनी या रस्त्याचे स्वप्न फळदेसाई यांच्यामुळे पूर्ण झाल्याने आनंद झाल्याचे सांगितले. त्यांनी नारायण झांटय़े आणि धुमे यांची यावेळी आठवण करुन दिली. फळदेसाई यांनी स्वखर्चाने रस्ता करुन दिल्याबद्दल पंच सदस्य विलन परब यांच्या हस्ते फळदेसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सुरुवातीस जानवी नाईक हिने पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत पेले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत भांडारे यांनी केले.