प्रतिनिधी /पणजी
राधाकृष्ण विद्यालय डिचोली स्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत भारताचे थोर शिक्षण तज्ञ व ज्यांच्या आदरार्थी शिक्षक दिन साजरा केला जातो असे थोर व्यक्तिमत्व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोला मुख्याध्यापक श्री चंद्रकांत चांदेकर व शाळेचे सांस्कृतिक सचिव श्री विद्याधर राऊत यांच्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री चांदेकर यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी आदर व्यक्त करीत शिक्षक दिनाचे महत्व विषद केले. तसेच विद्यार्थिनी शिक्षक दिनानिमित्त ऑनलाइन पाठवलेल्या व्हिडिओ बद्दल आभार व्यक्त करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांना भेट वस्तू व गुलाब पुष्प देऊन शिक्षका प्रती आदर व्यक्त करण्यात आला. या कामी कुमारी अर्पिता सिंग व परणीता पुरोहित या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
शाळेचे कलाशिक्षक श्री मितेश गावकर व इतर सहकारी शिक्षकांनी आकर्षक असे भिंती पत्रक तयार केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका अन्वी नावेलकर व फरिदा पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेचे सांस्कृतिक सचिव श्री विद्याधर राऊत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केली.