वार्ताहर/ हलगा
दीपावलीनिमित्त रायगड येथे दीपोत्सव करण्यासाठी बेळगाव परिसरातील शिवभक्तांनी सायकलवरून जाण्याची मोहीम आयोजिली आहे. या शिवभक्तांना हलगा येथे शुक्रवार दि. 13 रोजी शुभेच्छा देऊन उत्साहात रवाना करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे शिवभक्त नेहमीच अनेक मोहिमेच्या माध्यमातून जात असतात. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हलगा, मच्छे, वाघवडे, धामणे या गावातील धारकरी सायकलवरुन ही मोहीम आयोजिली आहे. यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी हलगा येथील शिवपुतळा आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. प्रेरणामंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर उपस्थित धारकऱयांना शुभेच्छा देण्यात आल्या. शिवभक्त तरुणांनी सायकल चालविण्याचे फायदे समाजाला उपयोगी आहेत. या माध्यमातून ही सायकल मोहीम आखण्यात आली आहे, असे सांगितले. यावेळी हलगा ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते..