रविवार दि.30 मे ते शनिवार दि.5 जून 2021
मेष
या सप्ताहात वृषभेत बुध वक्री, कर्केत मंगळ प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. धंद्यात काम वाढेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नोकरीत तुम्ही प्रगती कराल. वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. चर्चा करतांना वाद होईल. विरोधक हल्लाबोल करतील. संसारात क्षुल्लक कारणाने तणाव होईल. स्पर्धा जिंकाल.
वृषभ
या सप्ताहात कर्केत मंगळ प्रवेश, तुमच्या राशीत बुध वक्री होत आहे. धंद्यात फायदा वाढेल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने गुंतवणूक करता येईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. घरातील कामे होतील. शुभसमाचार मिळेल. मुलांच्या सुखासाठी विचार कराल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. नवा अधिकार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल.
मिथुन
या सप्ताहात कर्केत मंगळ प्रवेश, वृषभेत बुध वक्री होत आहे. धंद्यात गोड बोला, हिशोब नीट करा. संयमाने प्रश्न सोडवा. नोकरीत कायद्याला कमी लेखू नका. प्रवासात घाई करू नका. संसारात गैरसमज होईल. खर्च वाढेल. राजकीय- सामाजिक क्षेत्रात इतरांच्या सांगण्यावरून तुम्ही मत मांडू नका. व्यसन मनस्ताप देणारे ठरेल.
कर्क
या सप्ताहात तुमच्या राशीत मंगळ, वृषभेत बुध वक्री होत आहे. महत्त्वाची कामे करून घेण्याचा प्रयत्न करा. मंगळवार, बुधवार प्रवासात सावध रहा. वादविवाद जास्त वाढवू नका. नोकरीत कामाचा बोजा वाढेल. घरातील कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यातील योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. नवीन ओळखी होती. स्पर्धेत प्रगती कराल.
सिंह
या सप्ताहात कर्केत मंगळ, वृषभेत बुध वक्री होत आहे. संमिश्र स्वरुपाच्या घटना घडतील. धंद्यात फायदा होईल. वाहनापासून धोका संभवतो. काळजी घ्या. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीत तुमच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ होईल. विरोधक तणाव निर्माण करतील. राग वाढवणारे वातावरण तयार होईल. स्पर्धेत टिकून रहाल.
कन्या
या सप्ताहात कर्केत मंगळ, वृषभेत बुध वक्री होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर कठीण प्रश्न निर्माण होईल. धंद्यात नवे काम मिळेल. वसुली करा. नव्या परिचयातून फायदा होईल. नोकरीत प्रभाव पडेल. संसारातील कामे होतील. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात चर्चा सफल होईल. अधिकार मिळण्याची आशा वाढेल.
तुळा
या सप्ताहात कर्केत मंगळ प्रवेश, वृषभेत बुध वक्री होत आहे. व्यवहारात सावध रहा. धंद्यात कायदा पाळा. नोकरी टिकवा. वरि÷ांची नाराजी होऊ शकते. संसारात तणाव होऊ शकतो. वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अडकवण्याचा डाव रचला जाण्याची शक्मयता आहे. प्रवासात घाई करू नका. स्पर्धा कठीण असेल.
वृश्चिक
या सप्ताहात कर्केत मंगळ प्रवेश, वृषभेत बुध वक्री होत आहे. धंद्यात नोकरवर्ग त्रस्त करेल. तुम्ही दिलेला शब्द तुम्हाला पाळणे कठीण आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव पडेल. संसारात इतरांची काळजी कराल. राजकीय, सामाजिक कार्यात जवळच्या लोकांची नाराजी होईल. प्रवासात घाई करू नका. स्पर्धा जिंकाल.
धनु
या सप्ताहात कर्केत मंगळ प्रवेश, वृषभेत बुध वक्री होत आहे. तुमचा आत्मविश्वास, उत्साह वाढेल. कोणताही निर्णय उतावळेपणाने घेऊ नका. कुणालाही शब्द देऊन अडकू नका. नोकरीत काम वाढेल. संसारात नातलग तुम्हाला कोंडीत पकडतील. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. संयम ठेवा. धंद्यात उधारी करू नका. स्पर्धा मेहनतीची वाटेल.
मकर
या सप्ताहात कर्केत मंगळ प्रवेश, वृषभेत बुध वक्री होत आहे. धंद्यात भागिदार, नोकर यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. अनाठायी खर्च होईल. यंत्र बिघडेल. संसारात कामे वाढतील. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा. नोकरीत वरि÷ांना नाराज करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात ठरविलेले काम वेळेत पूर्ण करा. पुढे अडथळे येतील. स्पर्धा जिंका.
कुंभ
या सप्ताहात कर्केत मंगळ प्रवेश, वृषभेत बुध वक्री होत आहे. धंद्यात तणाव होईल. नोकरवर्गाची कमी जाणवेल. संसारात किरकोळ तक्रारी उद्भवतील. नोकरी कायदा पाळूनच कामे करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप केला जाईल. तुमची टीका रास्त असेल. विरोधक मैत्री करण्यास येतील. स्पर्धा सोपी नाही.
मीन
या सप्ताहात कर्केत मंगळ प्रवेश, वृषभेत बुध वक्री होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तणाव होईल. धंद्यात फसगत, वाद टाळा. नोकरी टिकवा. संसारात खर्च वाढेल. उधारी देऊ नका. वस्तु नीट सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. तुमचा प्रभाव टिकवण्यासाठी कष्ट घ्या. स्पर्धेत प्रगती कराल. तुमचा मत्सर करणाऱयांच्या कटकारस्थानांपासून सावध रहा.