02.03.2022
नमस्कार, मागच्या भागात आपण सहीचे काही नमुने आणि त्याचे विश्लेषण पाहिले. या भागात आपण आपली सही कशा प्रकारे बदलून त्याचे सकारात्मक परिणाम साधू शकतो हे पाहू या. मागच्या भागात आपण भैयू महाराज यांची सही बघितली. त्यात शेवटच्या अक्षराची रेघ खाली आलेली पाहिली. ही रेघ व्यक्तिमत्त्वातील पडझड (डाऊन फॉल) आणि दुर्दैवी अंत दाखवते. अरुण जेटली, श्रीदेवी यांच्या सहीमध्ये देखील अशी रेघ आढळते. हिटलरची सही जर तुम्ही इंटरनेटवर पाहिली तरी तुम्हाला हा मुद्दा पटेल. म्हणजेच जर तुमच्या सहीमध्ये जर शेवटची रेघ खाली जात असेल तर ती सुधारली पाहिजे. आता खालील सही पहा. या व्यक्तीने आपल्या सहीवर रेघा ओढल्या आहेत. स्वतःच्या हातून स्वतःचे नुकसान हे या सहीवरून सहज कळते. या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. म्हणजे सहीवरून खालील गोष्टी कळू शकतात.
1.सही खाली उतरणारी- नैराश्य नुकसान, 2. सहीचे पहिले अक्षर मोठे -आरंभशूर, 3. सुरुवातीला अक्षरावर गोल- स्वमग्न, अहंपणा, 4. सहीखाली जाड रेघ आणि बिंदू ‘माझेच खरे’ स्वभाव, 5. शेवटच्या अक्षरापासून पहिल्या अक्षराकडे येणारी रेघ- येरे माझ्या मागल्या’ स्वभाव, 6. सही मध्ये फूली किंवा क्रॉस- चुका करणारी व्यक्ती, 7. न समजणारी गिचमिड सही- वास्तव लपवणारी व्यक्ती. 8. आडनावाला महत्त्व देणारी सही- घराण्याबद्दल अनावश्यक आदर, 9. नावाला महत्त्व देणारी सही- स्वतःची ओळख निर्माण करण्यावर भर.
आता सही कशी असावी? तर 1. सही मध्ये गिचमिड नको. 2. क्रॉस नको, 3. स्पष्ट सुंदर आणि पुढे जाणारी, 4. अनावश्यक गोलाकार, अंडरलाईन नको. 5. खालच्या दिशेने जाऊ नये.
अशा रीतीने सहीमध्ये बदल करून आपण व्यक्तीमत्त्वात आणि वृत्तीमध्ये सकारात्मकता आणू शकतो. अडचणी दूर करू शकतो. भविष्य घडवू शकतो.
महाउपायः कर्जाचा डोंगर चढला असेल, लोकांनी जगणे असहय़ केले असेल तर हा उपाय श्रद्धेने करा. जिथे विहीर आहे किंवा बोअर मारली आहे, अशा स्मशानातील पाणी पिंपळाला घाला.
सोपी वस्तू टिप- बेडरुममध्ये पंख्याला मोरपीस लावावे. नशीब आणि प्रेम …..
मेष
आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपण करू नका. कौटुंबिक सुख चांगले आहे. धनप्राप्ती उत्तम असेल. नोकरदारांना चांगले दिवस आहेत. वाहन दुरुस्ती येऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. जुने येणे वसूल होईल. गुप्त बातमी समजेल. कष्टाचे प्रमाण वाढवा. उपायः शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा.
वृषभ
खेळीमेळीचे वातावरण असेल. स्वास्थ्य लाभ होईल. प्रेमीजनांना काळ अनुकूल आहे. शेअर्स सारख्या माध्यमातून धनलाभ, कलाकारांना सुसंधी मिळेल. नोकरदारांना प्रमोशन किंवा इंक्रीमेंटचे योग. वैवाहिक जीवनात समाधान असेल. भाग्याची साथ मिळण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. उपायः बुधवारी लहान मुलींना मिठाई भेट द्या.
मिथुन
विवाहाकरता केलेली बोलणी यशस्वी होतील. घर खरेदीचा विचार करत असाल तर उत्तम योग आहे. गुंतवणुकीतून फायदा मिळेल. कौटुंबीक वाद वाढू देऊ नका. प्रवास टाळा. व्यावसायिकांनी अधिक प्रयत्न करावेत. नोकरदारांना फायदा आहे. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतो. उपायः गुरुवारी दुपारी 12 च्या दरम्यान दत्तदर्शन घ्या.
कर्क
आरोग्य सांभाळा. कागदोपत्री व्यवहार यशस्वी होतील. छोटय़ा प्रवासाचे योग आहेत. स्थावर मालमत्तेसंबंधी प्रश्न सुटू लागतील. बोलण्यात मधुरता ठेवा. प्रेमसंबंधात यश मिळेल. नोकरीत बोलणी खावी लागतील. वैवाहिक जीवनात कटुता येईल, असे वागू नका. उपायः वृद्धाश्रमात गूळ दान करा.
सिंह
व्यक्तिमत्त्वाला झळाळी मिळेल. घेतलेले काम आत्मविश्वासाने पूर्ण कराल. धनप्राप्ती सुगम होईल. पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. कामानिमित्त प्रवास घडेल. वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेमसंबंधात दुरावा येऊ शकतो. नोकरदारांना कष्ट जास्त फायदा कमी. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग येतील. उपायः मुंग्यांना साखर घाला.
कन्या
तब्येतीचा पाया सुधारत आहे. घरात मंगलकार्य घडेल. कौटुंबिक सुख उत्तम. धनप्राप्ती चांगली असेल. प्रवास घडेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.नोकरदारांनी वाद टाळावा. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. शत्रू तुमच्या प्रति÷sला मलीन करू शकतात. काळजी घ्या. उपायः ‘दुर्गे देवी पाही माम’ मंत्राचा शक्य तितका जप करा.
तुळ
आत्मविश्वासात वाढ होईल. कामात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. पैशांची आवक वाढेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. प्रवास टाळा. लहान भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. धोकादायक गुंतवणूक टाळा. प्रेमसंबंधात वाद निर्माण होतील. नोकरदारांना वरि÷ांमुळे मनस्ताप. वाहन जपून चालवा. उपायः जलाशयातील 5 दगड आणून पूजा करा. संध्याकाळी विसर्जीत करा.
वृश्चिक
आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. कुटुंबातील जे÷ व्यक्तीच्या तब्येतीबाबत काळजी वाटेल. प्रवासात धनहानी संभवते. जमिनीचे व्यवहार टाळा. जामीन राहाणे महागात पडू शकते. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. लाभ होतील पण कष्ट टाळू नका. उपायः मंगळवारी हनुमानाला बुंदीच्या लाडवाचा प्रसाद दाखवा.
धनु
तब्येतीची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. जुने आजार डोकेवर काढतील. धनप्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. लेखी व्यवहार करताना सावध रहा. नोकरदारांना कष्टाचे फळ मिळेल. प्रेमसंबंधात कटुता येऊ शकते. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील. वाहन चालवताना सावध रहा. उपायः पायाने अधू असलेल्या व्यक्तीला सन्मानपूर्वक वस्त्र भेट द्या.
मकर
नवीन भेटीगाठी होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील. आजार अंगावर काढू नका. बोलतान शब्द जपून वापरा. कुटुंबात वाद संभवतो. येणी वसूल करताना त्रास होईल. जमिनीच्या वादापासून दूर रहा. गुंतवणूक करताना सावध रहा. प्रेमसंबंधात मधुरता येईल. उपायः महादेवावर गंगाजलाने अभिषेक करा.
कुंभ
जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आईची मदत होईल. मान सन्मानात वाढ होईल. मित्रांची मदत मिळेल. भाग्याची साथ आहे. गुंतवणूक करणे टाळा. प्रेमप्रकरणात मनस्ताप संभवतो. वैवाहिक जोडीदाराशी वाद टाळा. सगळय़ा प्रकारच्या लाभाचे योग आहेत. उपायः पक्षांना बाजरा घाला.
मीन
भाग्याची साथ असली तरी कष्टाला पर्याय नाही. तब्येतीकडे लक्ष द्या. घरात वाद होणार नाही याची काळजी घ्या. प्रवासाचे योग आहेत. प्रेमप्रकरणात फसवणूक होऊ शकते. सावध रहा. नोकरदारांना अंतर्गत गटबाजीमुळे मनस्ताप होईल. जोडीदाराचा सल्ला घ्या. उपायः श्री दत्तगुरुंना पंचामृताचा अभिषेक करा.