बुधवार 25 नोव्हेंबर ते मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020
29 नोव्हेंबरला कार्तिक स्वामी दर्शन
हाती पैसा टिकत नाही, कितीही राबले तरी त्या प्रमाणात पैशाचा मोबदला मिळत नाही, कर्ज लवकर फीटत नाही, घरात वादविवाद, संघर्ष, एकमेकांशी मतभेद तसेच गैरसमज आणि एकवाक्मयता नसणे असे प्रकार कुठे ना कुठे दिसून येत असतात. प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही आर्थिक चणचण आहे, लक्ष्मीची कृपा नाही असे अनेक जण म्हणत असतात. उच्च शिक्षण असूनही चांगल्या नोकऱया मिळत नाहीत, एखाद्याला विश्वासाने दिलले पैसे अडकून बसतात, साऱया मागे अनेक कारणे असली तरी आर्थिक समस्या ही आज जीवघेणी समस्या आहे. लहान-थोर, गरीब-श्रीमंत जगातील सर्वच राष्ट्रे आर्थिक प्रगतीसाठी झटत असतात. आर्थिक विवंचनेसाठी काय करावे, त्यातून सुटका कशी होईल, असा प्रश्न अनेक जण विचारत असतात. जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर असणारच, या न्यायाने पाहता अत्यंत सोपा आणि साधा उपाय म्हणजे कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्र जोपर्यंत आहे, तोपर्यंत गणेशाचा भाऊ श्री कार्तिक स्वामी यांचे दर्शन घेतल्यास आर्थिक समस्यांवर निश्चितच मार्ग निघतो असे आजवरच्या 15, वर्षाच्या पाहणीतून दिसून आलेले आहे. दैवीकृपेची साथ फक्त प्रामणिकपणे काम करणाऱया लाभते. माणसाला जे यश किंवा अपयश मिळते ते सारे आपल्या कर्माचे फळ असते. त्यामुळे आपले प्रयत्न जर खरोखर प्रामाणिक असतील तर लक्ष्मीची कृपा होतेच. येत्या 29 तारखेला दुपारी 12.48 पासून कार्तिक पौर्णिमा सुरू होते व कृतिका नक्षत्र सोमवारी पहाटे पाचपर्यंत आहे. त्यामुळे या काळात कार्तिक स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे. हल्ली बऱयाच ठिकाणी कार्तिक मंदिरे दिसतात. जेथे शक्मय आहे तेथे दर्शन घ्यावे. पण त्यातही जेथे रोजच्यारोज पूजा असते, ती मंदिरे जागृत असतात. देवाला अमुकच द्या, तमुकच द्या असे काही नसते. तुम्ही किती श्रद्धेने दर्शन घेत आहे याला महत्त्व आहे. ज्या ठिकाणी देवाच्या नावाने बाजार सुरू असतो तेथे जागृती नसते तो फक्त धंदा असतो. त्यामुळे त्या दिवशी फक्त दर्शन घ्यावे आणि कार्तिक स्वामीचे स्तोत्र अथवा प्रज्ञा स्तोत्र किंवा त्यांचीस्वामींची 27 नावे यांचे पठण करावे मंदिर नसल्यामुळे ज्यांना दर्शन घेणे शक्मय नसेल त्यांनी घरातच शिवलीलामृतातील तेराव्या अध्यायाचे श्रद्धापूर्वक वाचन करावे. त्याचाही अनुभव चांगला येईल. कार्तिक स्वामी हे मुळातच अत्यंत दयाळू व त्वरित अनुभव देणारे पण तितकेच अत्यंत कठोर व अपराध्यास कठोर शासन करणारे पण आहे. त्यामुळे कार्तिक स्वामी दर्शनाचा चांगला अनुभव यायला हवा असेल तर सर्व तऱहेच्या व्यसनापासून दूर रहा. शक्मयतो कोणाविषयी वाईट चिंतू नका. अनैतिक मार्गाने धनार्जन असेल तर या दर्शनाचा काहीही फायदा होणार नाही. या दिवशीच्या कार्तिक स्वामी दर्शनाने संपूर्ण वर्ष आर्थिक बाबतीत चांगले जाते. संपूर्ण वर्षभर स्वामींचे स्मरण केल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते असे अनुभव आहेत. देशात कोरोंनाच्या दुसऱया लाटेची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कार्तिक स्वामी दर्शनाच्यावेळी. कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून मगच देवदर्शन घ्या. या दिवशी महिला व पुरुषांना सर्वानाच दर्शन घेता येते. कार्तिक स्वामी दर्शनाचे अनेक फायदे आहेत पण जागेच्या अभावी ते सर्वच देणे शक्मय नसते.
मेष
भाग्योदयाची सुरुवात जरी झाली, आर्थिक आवक वाढली, तरी काही व्यसनाधीन लोकांमुळे आर्थिक अडचणीत याल. त्यांच्यापासून फायदा न होता उलट नुकसान वाढतं राहील. गैरसमजुतीमुळे झालेले वाद-विवाद दूर होतील. अचानक जर आर्थिक व्यवहार करायचा झाल्यास कागदपत्रे नीट वाचून मगच सही करावी. शनि-गुरुचा मोठा फायदा होणार आहे. नोकरी-व्यवसायात महत्त्वाची स्थित्यंतरे घडतील. एखादे महत्त्वाचे मोठे काम मिळण्याची शक्मयता आहे.
वृषभ
मित्र-मैत्रिणी, शेजारीपाजारी यांना काहीतरी आर्थिक अडचण जाणवेल व तुमच्याकडे मदतीचा हात मागतील, पण विचारपूर्वक निर्णय घ्या. अन्यथा नुकसानीला सामोरे जावे लागेल. वाहन चालविताना गाडी पूर्णपणे व्यवस्थित चेक करूनच चालवावी. व्यसनापासून शक्मयतो दूर राहावे. भाग्यातील गुरु-शनिमुळे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या प्रयत्नामुळे एखाद्या व्यक्तीचे लग्न ठरू शकेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
मिथुन
सध्या कसोटीचा काळ सुरू झालेला असून सर्व बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. अष्टमातील शनि-गुरु म्हणजे अचानक काही नवीन संकटे येऊ शकतात, पण त्यातून काहीही वाईट न होता उलट चांगलेच होईल. मोठी गंडांतरं, संकटे आली तरी त्यातून कसे बाहेर पडाल ते कळणार देखील नाही. आर्थिक बाबतीत आगामी कालखंड अतिशय उत्तम आहे, पण बेफिकीरवृत्ती, चंचलपणा, व्यसनाधीनता, कटुता व गैरसमज यापासून दूर राहणे आवश्यक आहे. आगामी काही काळात कुणाचेही मन दुखविण्याचा प्रयत्न करू नका.
कर्क
काही वेळा आपली चूक नसतानाही नुकसान सोसावे लागते किंवा अपमानास्पद परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी मन शांत ठेवून निर्णय घ्यावेत. वडिलधाऱयांशी मतभेद होऊ नका. शारीरिक आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरेल. मानसिक संतुलन चांगले राहील. आर्थिक बाबतीत कोणत्याही अडचणी येणार नाहीत. कर्ज वगैरे असेल तर ते फेडण्याचा प्रयत्न करा. मालमत्तेसाठी प्रयत्नचालू असतील तर त्यात सफल व्हाल. कोर्ट प्रकरणे सुरू असतील तर ती रखडण्याची शक्मयता दिसते.
सिंह
आपले प्रयत्न योग्य दिशेने असतील तर देवही आपल्याला मदत करतो याचा अनुभव या आठवडय़ात येईल. काही न होणारी कामे सहज होऊन जातील. गुरु- शनि युती आरोग्याच्या बाबतीत चांगली नाही.जरा काळजी घ्या. आध्यात्मिक बाबतीत चांगले यश मिळवाल. गुप्तशत्रूंच्या कारवाया उघड होतील. त्यातून काही नवीन गुपिते व कारस्थाने दिसून येतील, पण ते चेहऱयावर दाखवू नका.
कन्या
गुरु-शनिमुळे जीवनाला महत्त्वाचे शुभ वळण लागेल. पूर्वीची काही कामे असतील तर ती पूर्ण करून घ्या. मुलाबाळांच्या बाबतीत उत्तम योग. शेजारी व नातेवाईक यांच्याशी किरकोळ कारणावरून तेढ निर्माण होईल. प्रवासात अडचणी व शारीरिक त्रास होतील. आर्थिक बाबतीत ग्रहमान उत्तम आहे. जागेचे व्यवहार यशस्वी होतील. कोर्ट प्रकरणे असतील तर जरा सावध राहावे लागेल. नोकरीत स्थलांतराचे योग दिसतात.
तूळ
भावनेच्या भरात आपण काहीतरी बोलून जातो, पण नेमके लोक त्याचा गैरवापर करतात याचा अनुभव येईल. त्यामुळे या आठवडय़ात प्रत्येक शब्द जपून बोलणे आवश्यक आहे. सुखस्थानातील शनि-गुरुमुळे नोकरी-व्यवसायात महत्त्वाची व शुभ स्थित्यंतरे घडतील. विवाहासाठी सध्या ग्रहमान अनुकूल नाही पण वाटाघाटी करण्यास हरकत नाही. चांगल्या नोकरीचे योग आले असतील तर स्वीकारू शकता. तुमच्याकडे जर एखादी कलाकुसर असेल तर त्यातून आर्थिक फायदा होऊ शकता.s
वृश्चिक
असलेली नोकरी सोडून पळत्या मागे लागू नका. गुरुचे पाठबळ संपलेले आहे. त्यामुळे यापुढे आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. जी काही नवीन कामे मिळतील त्यात किचकट जबाबदारी असेल. प्रवास, नातीगोती जोडणे, लिखाण, साहित्य या बाबतीत चांगले अनुभव येतील. गुड वांङमय शिकण्याची संधी मिळेल. शनिच्या कृपेमुळे एखादे संकट आपणहून टळेल.
धनु
साडेसाती सुरू असल्याने प्रत्येक कामात अडथळे जाणवतील, पण शनि-गुरुच्या पाठिंब्यामुळे त्या सर्वांवर मात कराल. आर्थिक स्थैर्य लाभेल. जुनाट रोग तसेच काही गैरसमज असतील तर ते कमी होतील. व्यवसायिक, नोकरीविषयक तसेच वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी कमी होतील. विवाहासाठी अनुकूल काळ चांगली स्थळे आल्यास नाकारू नका.
मकर
राशीस्वामी बलवान असल्याने जे काही निर्णय घ्याल ते योग्य व निर्णायक असतील. मुलाबाळांच्या बाबतीत शुभ घटना. नोकरी-व्यवसायात नवे महत्त्वाचे फेरबदल घडतील. महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवलेला पैसा दुसऱया कामासाठी खर्च होईल. आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्मयता. घराचे प्रश्न मिटतील. आतापर्यंत काही कारणाने खोळंबलेली महत्त्वाची कामे यापुढे होऊ लागतील.
कुंभ
एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघावे अचानक नको ती व्यक्ती समोर यावी असे विचित्र ग्रहमान आहे. त्यामुळे कोणत्याही कामाला निघताना कुटुंबातील सदस्य व्यतिरिक्त इतर कुणालाही काहीही सांगू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे आवश्यक. गुरु व शनि दोघेही अनिष्ट स्थानी आहेत. त्यामुळे देवा धर्माकडे विशेष लक्ष द्या. एखादी किरकोळ चूक देखील मोठे उत्पात घडवू शकते.
मीन
लाभातील गुरु-शनि योग म्हणजे सायकल चालविणाऱयास विमान प्रवासाची संधी देणारास सुवर्णयोग. जीवनातील अनेक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास अनुकूल काळ सुरू आहे पण कष्ट व जिद्द यांचीही गरज आहेच. तुमच्याकडे जर काही चांगल्या कल्पना अथवा कला असतील तर त्याचा वापर करून पैसा कमवू शकता. मानसिकदृष्टय़ा उत्तम काळ. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य लाभेल.
नोकरी-व्यवसायात सर्वकाही उत्तम राहील. मालक वर्गाची खास मर्जी राहील.